College


 View College Photo Gallery    View Video Clip

योगवैद्यक – पदविका अभ्यासक्रम

माहितीपत्रक डाउनलोड करा.
हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून, पदविका प्राप्त झाल्यावर योग चिकित्सक (Yoga Therapist) या नामाभिधानाने योगोपचार रुग्णांना स्वतंत्रपणे देण्यास विद्यार्थी लायक असेल.

सध्याच्या बदलत्या वेगवान जीवन पद्धतीमुळे हृदयरोग, दमा, मधुमेह, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी यांसारख्या दैनंदिन जीवनात अत्यंत त्रासदायक ठरणाऱ्या व्याधी उद्भवत आहेत. यावर आधुनिक पाश्चात्य वैद्यक (अॅलोपॅथी) या शाखेतील औषधी व शस्त्रक्रिया उपचारांवर मर्यादा पडतात. पण योगोपचार मात्र यावर प्रभावी व सामान्य जणांना परवडणारा उपाय असल्याने त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारा हा अभ्यासक्रम अतिशय सामाजोपोयोगी आहे.

योगोपाचाराचे कार्य सर्वत्र देशभर व देशाबाहेर पसरविण्याच्या गरजेतून संजीवन योग फौंडेशन [नों. क्र. एफ १९४९१ (पुणे), महाराष्ट्र/३९७/२००४/पुणे], कबीर बाग, पुणे ३०. या न्यासाने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

अ) विषय :
 • योग तत्वज्ञान
 • पाश्चात्य वैद्यक (अॅलोपॅथी)
 • आयुर्वेद
 • योग प्रत्यक्षिक
आ) शिक्षण माध्यम = मराठी

१) योग तत्वज्ञान
 • योग संकल्पना, इतिहास, प्राचीन भारतीय परंपरा यांचे संधर्भात भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, योगोपानिषद, पतंजली योगदर्शन व हठयोग प्रदीपिका, विवेकसिंधू, संजीवन योग.
 • षटदर्शने, तन्मात्र, अष्टांगयोग – आकाश तत्व, प्रकृती पुरुष, ईश्वर संकल्पना.
 • आधुनिक वैद्यक मर्यादा, आसन – प्राणायाम महत्व, गतिशास्त्र, प्रत्याहार संकल्पना.
योग चाचण्या
 • स्वलिखित संगतवार विषय मांडणी, स्वाध्याय, आसन वैविध्य, व्याधी व योगोपचार स्वतःचे टिपण.
 • इतर व्यायाम व खेळ – योगासने आभ्यास व योगोपचार निरिक्षण, स्वतंत्र योगोपचार देण्याची क्षमता व प्राणायाम, संजीवन योगोपचार पद्धती.
२) पाश्चात्य वैद्यक (अॅलोपॅथी)
 • Functional anatomy and physiology under caption ‘Physiognomy’.
 • Study of different systems in body.
 • Role of hormones. Principles of medicine, Surgery and different chemical and mechanical tests.
 • Drugs and their forms.
वैद्यक चाचण्या व प्रात्यक्षिक
 • Mechanical - X-Ray etc.
 • Electrical – ECG etc.
 • Chemical – Laboratory Tests
 • Modern Tests – Basic understanding
३) आयुर्वेद
 • योग – आयुर्वेद संबंध, अभ्यासपद्धती, संदर्भग्रंथ परिचय
 • प्रकृती दोष – धातू, चर्या, आहार, मन, मार्माविज्ञान
 • रसायन चिकित्सा
चाचण्या व प्रात्यक्षिक
प्रकृती परीक्षण – वनस्पती औषध ओळख, व्याधीनिर्मिती प्रक्रिया, पंचकर्म – ओळख.

४) योग प्रत्यक्षिक
 • शरीर – मन सबंध – हालचाल संकल्पना
 • विकृत हालचाल – आसन , आधार संबंध
 • आधार वैविध्य – सालंब, निरालंब
 • स्थैर्य – आरोग्य – अंगलाघाव, आसनसंदर्भ
 • गती विच्छेद – प्राणायाम संदर्भ
 • संजीवन योग, विविध व्याधीन्वारचे योगोपचार विविध व्याधींचा अभ्यास
 • OPD व पेशंटच्या बॅचेस मध्ये प्रत्यक्ष अनुभव.
५) परीक्षा
चर्चासत्रे, सेमिनार्स, प्रश्नोत्तरे, तोंडी परीक्षा, मुलाखत, सत्रांत प्रात्यक्षिक परीक्षा, शोधनिबंध

टीप : सुसज्ज ग्रंथालय, दृकश्राव्य केंद्र, योगाप्रत्याक्षिक हॉंल, अभ्यासाच्या ऑडिओ – व्हिडीओ कॅसेटस् इ. सुविधा उपलब्ध.  


   Copyright 2012. All rights reserved for Kabir Baug. 51, Narayan Peth, Pune - 411 030.Ph.: 24450181, 24484423, 24480424. (M) : 9823029707. Fax : 020- 24481937. Email : kabirbaugl23@gmail.com